???? ????

???? ????

by Prasad Akkanawru
???? ????

???? ????

by Prasad Akkanawru

Paperback

$7.99 
  • SHIP THIS ITEM
    Qualifies for Free Shipping
  • PICK UP IN STORE
    Check Availability at Nearby Stores

Related collections and offers


Overview

About the Book:

काळराक्षस कलीला खात्री पटते की, मानव संपूर्णपणे त्याच्या तावडीत सापडला आहे. आता त्याला पडद्यामागे न राहता प्रत्यक्षपणे समोर येऊन पृथ्वीवर एकछत्री अंमल प्रस्थापित करायचा आहे. त्याकरिता त्याला हवं आहे युगानुयुगे देवगिरीच्या ताब्यात असलेलं प्रभू रामचंद्रांचं दिव्य विश्वसिंहासन. आपल्या हस्तकांसकट महान भूमी महाराष्ट्राला ताब्यात घेत, भारतभूवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो करतो. बाराव्या शतकात जन्मलेला यादव राजपुत्र सदाशिव पुन्हा सूर्यराजच्या स्वरूपात जन्म घेतो व कली सैतानाला त्याच्या मनसुब्यांपासून रोखू पाहतो. सूर्यराज, त्याची सहचारिणी कल्याणी व मराठीजन महाराष्ट्राला या संकटापासून वाचवू शकतील काय?

भारतीय संस्कृतीतील युग संकल्पना, अवतारवाद, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत व महाराष्ट्राचा भूत-वर्तमानकाळ यांची सांगड घालून महाराष्ट्राचा भविष्यवेध घेणारी, कलीराक्षस व सूर्यराज यांच्यातील संघर्षाची ही रोमहर्षक कहाणी मराठीजनांसमोर सविनय सादर.


Product Details

ISBN-13: 9788119445059
Publisher: StoryMirror Infotech Pvt Ltd
Publication date: 07/10/2023
Pages: 166
Product dimensions: 5.25(w) x 8.00(h) x 0.38(d)
Language: Marathi
Age Range: 13 - 18 Years

About the Author

About the Author: लेखक प्रसाद अक्कानवरु हे २०११ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेत (IPS) नियुक्त झालेले अधिकारी आहेत. त्यांचा जन्म १९८३ साली मराठवाड्यातील बोथी (ता. चाकूर जि. लातूर) या लहानशा गावी झाला. त्यांचे शिक्षण लातूर, नागपूर, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद अशा विविध ठिकाणी झाले आहे. मागच्या बारा वर्षांच्या सेवाकाळात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पोलीस प्रशासनातील महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. सध्या ते मुंबई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ या संस्थेचे प्राचार्यपद भूषवत आहेत. या पहिल्याच पुस्तकाद्वारे त्यांच्या व्यासंगाची आणि अस्सल मराठी संस्कृतीच्या सुपीक मातीत त्यांची मुळं किती घट्टपणे रुजली आहेत याची यथार्थपणे प्रचिती येते. मराठवाडा आणि विदर्भ या प्राचीन भूमींतील आध्यात्मिकतेचा समृद्ध वारसा या आधुनिक काळाच्या अनुषंगाने ते आपल्या लेखणीद्वारे समर्थपणे चालवत आहेत असे मात्र निश्चितपणे म्हणता येईल.
From the B&N Reads Blog

Customer Reviews