पुरुष ते पुरुषच..! (Purush Te Purushach...!)

पुरुष ते पुरुषच..! (Purush Te Purushach...!)

by Sanjay Prabhakar Patil
पुरुष ते पुरुषच..! (Purush Te Purushach...!)

पुरुष ते पुरुषच..! (Purush Te Purushach...!)

by Sanjay Prabhakar Patil

Paperback

$16.99 
  • SHIP THIS ITEM
    Qualifies for Free Shipping
  • PICK UP IN STORE
    Check Availability at Nearby Stores

Related collections and offers


Overview

About the Book:

"पुरुष ते पुरुषच..!" हे पुस्तक पुरुष स्त्रीवर कसा अन्याय आणि अत्याचार करतो. तसेच पुरुष हा स्त्रीला फक्त एक वस्तू म्हणून वागणूक देतो आणि स्त्री ही या व्यथा कोणाला सांगू शकत नाही आणि आयुष्यभर मात्र चूपचाप सहन करत असते. अशा स्त्री व्यथांच्या कथांचा हा संग्रह आहे.

या पुस्तकातील पहिलीच कथा 'पिशवी' ही कथा स्त्री एक सामान्य वस्तू आहे, अशी वागणूक मिळणाऱ्या असाहाय्य स्त्रीची हृदयस्पर्शी कथा आहे. या कथेवरून संपूर्ण पुस्तकातील सर्वच कथांचा अंदाज या पुस्तकाच्या वाचकांना येईल आणि असा अनुभव कुठेतरी आपल्याला ही आलेला आहे, याची अनुभूती होईल. स्त्रीला दैनंदिन जीवनात येणारे अनेक छोटे अनुभव आणि त्यातून तिची मानसिकता या कथांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच पुरुषी इगो ही दिसून येतो. प्रत्येक पुरुषच वाईट असतो, असंही नाही. त्यामुळे स्त्रीच्या बाबतीत पुरुषांच्या चांगुलपणाच्या ही काही कथा या कथासंग्रहात आहेत.

वाचकांना या कथा स्त्रीबद्दल वेगळीच दृष्टी देतील, अशी आशा मला वाटते. स्त्री आणि पुरुष दोघेही या कथा संग्रहातील कथा वाचतील आणि हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा मला वाटते.


Product Details

ISBN-13: 9789394603240
Publisher: Storymirror Infotech Pvt Ltd
Publication date: 06/15/2022
Pages: 196
Product dimensions: 5.25(w) x 8.00(h) x 0.45(d)
Language: Marathi

About the Author

About the Author: या पुस्तकाच्या लेखकांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील फैजपूर आहे. सध्या ते पालघर तालुक्यातील चिंचणी येथे वास्तव्यास आहेत. तेथेच के. डी अँड एम.के.ज्यु. कॉलेजमध्ये त्यांनी ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य केले आणि आता ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा विषय भौतिकशास्त्र असला तरी लेखनात विशेष रुची असल्याने त्यांनी अनेक कथा, लेख आणि कविता लिहिलेल्या आहेत. त्यातील अनेक कथा या राज्यातील दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या अनेक कथांना पारितोषिके मिळालेली आहेत. लेखनासोबत त्यांना चित्रकलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी पाचशेपेक्षा जास्त व्यंगचित्रे काढली आहेत आणि ती व्यंगचित्रे निरनिराळ्या दिवाळी अंक तसेच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली आहेत. त्यांची काही व्यंगचित्रे ही दै सकाळ या वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या स्टोरीमिरर तसेच इतर ही सोशल मिडियावर अनेक कथा, चारोळ्या, कविता आणि एक कादंबरी प्रकाशित झालेली आहे. त्यांनी स्त्री आणि तिच्या व्यथा या विषयावर लेखन केलं आहे. त्यांची "पुरुष ते पुरुषच..!" ही कथा मालिका खूप वाचकांनी पसंत केली आहे. तसेच त्यांनी 'संगणक तुमचा मित्र' या पुस्तकाचे लेखन आणि 'समाज अभियंता' या पुस्तकाचे लेखन तसेच संपादन केले आहे . तसेच काही अंक आणि काही दिवाळी अंक यांचेही संपादन केले आहे.त्यांना डहाणू तालुक्यातील बी. एस. सी. एस. आणि रोटरी क्लब यांचेतर्फे "आदर्श शिक्षक पुरस्कारा" ने सन्मानित करण्यात आलेलं आहे.
From the B&N Reads Blog

Customer Reviews